श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

अभिषेक:
श्री बल्लाळेश्वरांवर अभिषेकाने मनोकामना पूर्ण होतात अशी लाखो भक्तांना प्रचीती आली आहे. आपण ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही अभिषेकाची रक्कम देऊ शकता. अभिषेकाची इच्छा आपली आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्रींचे चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगार आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹ ५१/-

दिनविशेष अभिषेक:
आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसाला (उदा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आपल्या आप्तजनांचा स्मृतिदिन इत्यादी) श्रींच्या भक्तीची जोड त्या दिवसाला अजूनच तेजोमय झळाळी देईल. त्या अनुषंगाने हि दिनविशेष अभिषेकाची भक्तिमय सुविधा. अभिषेकाची इच्छा आपली आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्रींचे चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगार आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹ १०१/-

देणगी:
श्री बल्लाळेश्वर देवस्थान ही धार्मिक संस्था अधिकाधिक समाजाभिमुख होत असताना आपला देणगीरुपी खारीचा वाटा ह्या कार्याला वेगवान करेल. कोणतीही धार्मिक किंवा सामाजिक संस्था ही मिळणार्‍या देणगीवर चालत असते. श्री बल्लाळेश्वर देवस्थान अशा रितीने देणग्या घेत असते. देवस्थान कडे 80G चे अधिकृत प्रमाणपत्र आहे ज्याचा लाभ देणगीदारास उत्पन-करात मिळू शकतो.
कोणत्याही धार्मिक विधींसाठी अगर देणगीसाठी सभामंडपातील कार्यालयशी संपर्क साधावा व रक्कम/ धनादेश येथे देऊन रीतसर पावती घ्यावी.