श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

देवस्थानातील उपक्रम

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवल्याने जुलै ते सप्टेंबर पर्यंत पाण्याच्या टाक्यात कायम २.५ लाख लिटर पाणी साठवले जाते.

निर्माल्यापासून खत, हा प्रकल्प सुरु केल्याने तयार होणारे खत गरजूना दिले जाते.

भक्तनिवास १ वर सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवला आहे. तेथे दिवसाला १० KW वीज तयार होते. भक्तनिवास १ व २ येथे सोलर वॉटर हीटर बसवले आहेत.

दोन्ही मंदिरे व देवस्थानच्या इतर इमारती याना जनरेटरने विद्युत पुरवठ्याची सोय केली आहे.

श्रीबल्लाळेश्वर देवस्थानमार्फत नाममात्र शुल्कात वाचनालय चालवले जाते.

यज्ञयाग उपक्रम

देवस्थानतर्फे रु. २१,०००/- मध्ये आपण स्वतः गणेशयाग करू शकता. इतरही याग करावयाची व्यवस्था आहे. याबद्दल सविस्तर माहिती देवस्थानच्या कार्यालयात मिळेल.

धार्मिक उपक्रम

देवस्थानतर्फे रु. २१,०००/- मध्ये आपण स्वतः गणेशयाग करू शकता. इतरही याग करावयाची व्यवस्था आहे. याबद्दल सविस्तर माहिती देवस्थानच्या कार्यालयात मिळेल.

धर्मजागरणासाठी भजन, कीर्तन प्रवचनाचे आयोजन.

श्रींच्या जेष्ठ, भाद्रपद व माघ मासोत्सवाचे आयोजन संस्था मोठ्या दिमाखदारपणे करते.

संस्कारवर्गांचे आयोजन संस्था करत असते.

शैक्षणिक उपक्रम

सुधागड़ तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.

दरवर्षी देवस्थानतर्फे तालुक्यातील दहावी, बारावी व महाविद्यालयातील नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात येतो.

संस्थेने ह्यावर्षी १० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतले असून त्यांचा शैक्षणिक खर्च संस्था करते.

सामाजिक उपक्रम

देवस्थानतर्फे आदिवासींना दरवर्षी धान्य वाटप करण्यात येते.

देवस्थानने मंदिराजवळील झापाळे तलावातील गाळ काढून त्याचे सुशोभीकरण केले आहे.

पाली गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित व्हावी, त्यासाठी पाली ग्राम पंचायतीला २०एच.पी. पंप देण्यात आला.

पाली ग्राम पंचायतीला विविध विकास कामांसाठी वेळोवेळी निधी देणे.

अनेक मंदिरांना मदत करण्यात येते.

आपत्कालीन परिस्थितीत समाजाला व शासनाला मदत करण्यात येते.

श्रीबल्लाळेश्वर देवस्थानमार्फत नाममात्र शुल्कात वाचनालय चालवले जाते.

पर्यावरणपूरक उपक्रम

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवल्याने जुलै ते सप्टेंबर पर्यंत पाण्याच्या टाक्यात कायम २.५ लाख लिटर पाणी साठवले जाते.

निर्माल्यापासून खत, हा प्रकल्प सुरु केल्याने तयार होणारे खत गरजूंना दिले जाते.

भक्तनिवास १ वर सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवला आहे. तेथे दिवसाला २० KW वीज तयार होते. भक्तनिवास १ व २ येथे सोलर वॉटर हीटर बसवले आहेत.

संस्थेतर्फे प्लास्टीकचा अत्यल्प वापर केला जातो.

संथेने जुलै २०२३ ह्या महिन्यात एक विशेष वृक्षारोपण अभियानांतर्गत २१०० वृक्षांची लागवड केली.

प्रसादालायातील खरकट्याअन्नाला कचऱ्यात न टाकता त्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाते.

वैद्यकिय उपक्रम

तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते.

नेत्र रुग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रियेसाठी संस्थेचे अद्ययावत रुग्णालय असून आजपर्यंत हजारो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

महिन्यातील प्रत्येक रविवारी आयुर्वेदाचे डॉक्टर मोफत रुग्ण तपासणी करतात.

तसेच, प्रत्येक महिन्याच्या रविवारी तज्ञ अ‍ॅलोपॅथी डॉक्टर (मधुमेह तज्ञ, रक्तदाब तज्ञ, त्वचारोग तज्ञ, बालरोग तज्ञ इत्यादी) येऊन रूग्णांची मोफत तपासणी करतात.

संस्थेने वाजवी दरात रक्त तपासणीची सुविधा उभारलेली आहे.

दिव्यांगांना उपयुक्त साहित्याचे वाटपही संस्था करते.

रक्तदान शिबीर, आरोग्यशिबीर, योगवर्ग तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी परिसंवादांचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते.

डायलेसिसच्या रुग्णांनासाठी पनवेल येथील पटवर्धन हॉस्पिटलला संस्थेतर्फे डायलेसिस मशिन्स साठी देणगी देण्यात येते.

आगामी बहु-उद्देशीय उपक्रम

मंदिरापासून जवळच असलेल्या जागेत उद्यान (theme park) तयार करणे.

श्री बेल्लाळेश्वर मंदिराचा इतिहास व पौराणिक कथेचा “लेझर शो” हा उपक्रम भावि-काळात करण्यात येणार आहे.

उच्च दर्जाची शिक्षण सुविधा उभारणे.

रुग्ण सेवा केंद्र उभारणे.

सुधागड तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन विकसित करणे.