श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे. सभामंडपातील कार्यालयात पुस्तिकेची चौकशी करावी.

कै.श्रीमंत मोरोबादादा फडणीस यांनी केलेली देवालय प्रशासन व्यवस्था

सदर देवालयाची व उत्सवाची सर्व व्यवस्था प्रथम कै. श्री. मोरोबादादा फडणीस यांचे वंशज पहात असत. श्रींचे देवळाजवळ फडणीसांचा वाडा होता. तेथे फडणीस यांचे कारभारी राहून व्यवस्था बघत असत. परंतु सदर वाडा शके १८३२-३३ म्हणजे इ.स. १९१०-११ साली अग्निदग्ध झाला व त्यानंतर ५-६ वर्षांत कै. श्रीमंत फडणीस यांनी देवस्थानची व उत्सवाची सर्व व्यवस्था देऊळवाडकर मंडळींकडे सोपवली.


श्री बल्लाळेश्वर मंदीराची दैनंदिन व्यवस्था

सार्वजनिक विश्वस्त कायदा अस्तित्वात आल्यानंतर सद्यस्थितीत देवस्थानाचा कारभार हा धर्मादाय आयुक्त यांनी मंजूर केलेल्या योजनेप्रमाणे “श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली” या नावाने संस्था स्थापून दि . १५ एप्रिल १९५२ रोजी ट्रस्ट रजिस्ट्रेशन नं ए /२१५ रायगड, नोंदणी केलेली असून देवस्थानचा कारभार विश्वतांच्या देखरेखीखाली चालतो.


मंदिर व्यवस्थापन

श्री बल्लाळेश्वर व श्री धुंडीविनायक ही दोन्ही मंदिरे पहाटे ५ ते रात्री १०.३० पर्यंत दर्शनासाठी उघडी असतात असतात. रात्री १०.३० नंतर कोणत्याही परिस्थितीत मंदिरे उघडण्यात येत नाहीत.

प्रत्येक दिवशी मंदिरात पहाटे सनईवादन ,धुपारती, नित्यपूजा , नैवेद्य व रात्री ८ वाजता आरती होते.

भाविकांना पहाटे ५ .३० ते दुपारी १२:०० पर्यंत सोवळ्याने आतील गाभाऱ्यात देवस्थानच्या पुजाऱ्याकडून स्वहस्ते पूजा करता येते.

प्रत्येक चतुर्थीला सायंकाळी पंचामृती स्नानानंतर पोशाख, नैवेद्य,आरती ,श्रींची पालखी, मंत्रपुष्प असा कार्यक्रम होतो.

श्री बल्लाळेश्वर मंदिरात प्रत्येक एकादशीला स्थानिक मंडळाचे भजन असते.

परंपरेनुसार श्रींचे मंदिरात आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात विविध विषयावर प्रवचन होते. कार्तिक शुद्ध एकादशीला ग्रंथ दिंडी होऊन प्रवचन समाप्ती होते.

कार्तिक महिन्यात काकड आरतीला बहुसंख्याने महिला सहभागी होतात.

“श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली” तर्फे गेली अनेक वर्षें अभिषेक योजना राबवली जात आहे. आपण दिलेल्या अभिषेक देणगीतून ,अभिषेक मंडळ पहाटे ५.३० ते दुपारी १ व दुपारी ४ ते संध्याकाळी ७ या वेळेत अभिषेक, सहस्रावर्तने ,दुग्धाभिषेक ,लघुरुद्र प्रत्यक्ष करत असतात. भाविकांनी नमूद केलेल्या दिवशी त्यांनी सांगितलेले धार्मिक कृत्य करून, त्याचा अंगारा व प्रसाद पाठविला जातो.

मंदिरात देणगी, अभिषेक व अन्य पावत्या करण्यासाठी सभा मंडपात छोटे कार्यालय आहे. आपण दिलेल्या प्रत्येक गोष्टीची आपणास पावती मिळते. देवस्थानतर्फे करण्यात येणाऱ्या अभिषेकांचे सध्याचे दक्षिणामूल्य पुढीलप्रमाणे आहे.

अभिषेक, दिनविशेष अभिषेक व देणगी online पद्धतीने स्वीकारली जाण्याची तरतूद वेबसाईट वर केली असून उर्वरित अभिषेक व धार्मिक विधींसाठी मंदिरातील कार्यालयात संपर्क करावा.

अभिषेक: श्री बल्लाळेश्वरांवर अभिषेकाने मनोकामना पूर्ण होतात अशी लाखो भक्तांना प्रचीती झाली आहे. आपण ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही अभिषेकाची रक्कम देऊ शकता. अभिषेकाची इच्छा आपली आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्रींचे चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगार आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹ ५१/-

दिनविशेष अभिषेक: आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसाला (उदा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आपल्या आप्तजनांचा स्मृतिदिन इत्यादी) श्रींच्या भक्तीची जोड त्या दिवसाला अजूनच तेजोमय झळाळी देईल. त्या अनुषंगाने हि दिनविशेष अभिषेकाची भक्तिमय सुविधा. अभिषेकाची इच्छा आपली आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्रींचे चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगार आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹ १०१/-

अभिषेक
₹ ५१/-
दिनविशेष अभिषेक
₹ १०१/-
देणगी
ऐच्छिक

देवास अर्पण केलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू पुजारी अगर गुरव यांचेकडून परत घेऊन त्या देवस्थान कार्यालयात किंवा सभामंडपातील कार्यालयात घेऊन त्याची रीतसर पावती देण्यात येते.

भाविकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध.

सकाळी ११ ते २.३० या वेळात रुचकर प्रसाद भोजन उपलब्ध.

प्रसाद लाडू मिळतात.

मोफत प्रशस्त पार्किंगची व्यवस्था.

देवस्थानच्या वेगवेगळ्या जागेत आर. ओ. फिल्टरसह पिण्याच्या पाण्याचे कूलर बसवलेले आहेत.

भक्तनिवास १ व २ तसेच प्रसादालय या ठिकाणी स्त्रिया व पुरुषांसाठी स्वच्छता गृहांची सोय आहे.

भक्तनिवास १ येथे अपंगांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था आहे.

देवस्थानतर्फे पुजारी, कारकून, शिपाई , सफाईकामगार ,सुरक्षारक्षक यांची पगारी नेमणूक करण्यात आली आहे.